पुणे | प्रतिनिधी |
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती अत्यवस्थ झाली असून, त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे रुग्णालय सुत्रांनी सांगीतले.
बाबासाहेबांनी नुकतेच शंभराव्या वर्षांत पदार्पण केले होते. 26 ऑक्टोबरला सकाळी ते उठले असता त्यांचा तोल गेला आणि त्यांच्या डोक्याला इजा झाली. त्यानंतर त्यांना तातडीने मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आले.
तेथेही पहिले दोन दिवस ते व्यवस्थित बोलत होते. त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना न्यूमोनिया झाला आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. नंतर त्यांची प्रकृती खालावत गेली.रुग्णालय प्रशासनाने पुरंदरे यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगीतले आहे.दरम्यान,दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाततर्फे बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रकृतीबाबत माहिती देण्यात आली.त्यामध्ये त्यांना न्यूमोनिया झाल्याने गेल्या आठवड्यापासून उपचार सुरु असून,त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याने सुचित करण्यात आले आहे.बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रकृतीबाबत सोशल मिडियावर विविध प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्याने मंगेशकर रुग्णालय परिसरातही पुरंदरे यांच्यावर प्रेम करणार्यांची संख्या ही वाढू लागली होती.पण पोलिसांनी या सर्वांना घरी जाण्याचे आवाहन केले.सध्या या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.