देगावच्या उपसरपंचपदी शेकापचे दिनेश गुगळे बिनविरोध

| माणगाव | प्रतिनिधी |

तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण अशा ओळखल्या जाणार्‍या ग्रामपंचायतींपैकी एक देगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेकापचे दिनेश नथुराम गुगळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी माणगावचे पुरवठा अधिकारी संजय माने यांनी ही घोषणा केली.

मोर्बा गावचे शेकापचे ज्येष्ठ नेते अस्लम राऊत, माणगाव तालुका चिटणीस रमेश मोरे, माणगाव तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाचे सभापती निलेश थोरे, कृउबा समिती सभापती संजय पंदेरे, मोर्बा माजी सरपंच विलास गोठल, शेकापचे तालुका सहचिटणीस राजेश कासारे, माजी उपसरपंच हसनमिया बंदरकर, निजाम फोपळूणकर, युवानेते नितीन वाघमारे, मधुकर अर्बन, किशोर जाधव, माजी सरपंच शेलार, संदेश गुगळे, विनोद गुगळे, काशीराम गुगळे, मुस्ताक राऊत, विलास मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी, ग्रामस्थांनी, मित्रपरिवार यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या निवडीनंतर दिनेश गुगळे यांनी ग्रामपंचायतीचा विकास हेच एकमेव ध्येय आपले आहे. पक्षाचे सर्व नेतेमंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असून, मतदारांनी माझ्या कार्यप्रणालीवर विश्‍वास दाखवीत पुन्हा एकदा देगाव ग्रामपंचायतीवर मला निवडून दिल्याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार व ऋण व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Exit mobile version