। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची दै.कृषीवल व शेकापचे माणगाव तालुका चिटणीस रमेश मोरे मित्रमंडळातर्फे दि.9 एप्रिल रोजी दुपारी 3:30 वाजता राजमाता जिजाऊ मैदान गोरेगाव ता.माणगाव याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची बैठक मंगळवारी (दि.29) कृषी उत्पन्न बाजार समिती माणगाव याठिकाणी शेकापचे जेष्ठ नेते अस्लम राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत व तालुका चिटणीस रमेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाली. यावेळी या हळदी कुंकू कार्यक्रमासाठी तालुक्यातून जवळपास 2500 महिला सहभागी होणार असल्याचे रमेश मोरे यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना सांगितले.
माणगाव तालुक्यात गोरेगाव येथे दै.कृषीवल व रमेश मोरे मित्रमंडळातर्फे प्रथमच मोठ्या प्रमाणात हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास शेकापचे ज्येष्ठ नेते तथा आ.जयंत पाटील, शिवसेनेचे आ.भरत गोगावले, शेकापचे माजी आ.पंडित पाटील, चित्रलेखा पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी देऊन या समारंभात सर्वांनी जास्तीत जास्त महिलांना निमंत्रित करावे असे आवाहन केले.
या बैठकीला माणगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय पंदेरे, ज्येष्ठ नेते विजय आंब्रे, गोविंद पवार, याकूब चिलवान, दत्ताराम पाते, तालुका शेकाप सहचिटणीस राजेश कासारे, महेश सुर्वे, माणगाव तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे सभापती निलेश थोरे, भागोजीबुवा डवले, मोर्बा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विलास गोठल, उपसरपंच हसनमिया बंदरकर, माजी उपसरपंच अमोल मोहिते, समीर सकपाळ, नितीन वाघमारे, निजाम फोपळूणकर, देगावचे माजी सरपंच दिनेश गुगळे, विलास मोरे,योगेश मोरे, समीर लहाने ,नलफोडी गावचे अध्यक्ष बडबे, माजी सरपंच महादे आदी उपस्थित होते.