दिनेश काटकर तालुकाध्यक्षपदी

| पाली | वार्ताहर |

पालीतील युवा उद्योजक दिनेश दिलीप काटकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाच्या सुधागड तालुका अध्यक्षपदी पक्षाचे नेते तथा माजी मंत्री आ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली. त्यांच्या हस्ते काटकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदश्चंद्र पवार असे दोन वेगळे गट झाले आहेत. त्यामुळे सुधागड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष पद रिक्त होते. उद्योजक दिनेश काटकर यांनी सामाजिक संघटनांच्या माध्यमातून शैक्षणिक, सांस्कृतिक व अनेक लोकाभिमुख सामाजिक कार्ये केली आहेत. युवकांशी असणारा दांडगा जनसंपर्क व सामाजिक कार्यातील ओढ पाहता पक्षवाढीच्या दृष्ठिकोनातून त्यांची रायगड जिल्हाध्यक्ष आमिर खानजादे यांच्या मार्गदर्शनाखाली सुधागड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीवेळी मंगेश वरंडे, राहुल पिंपळे, प्रतीक आंग्रे, शब्बू पानसरे आदी मित्रमंडळी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Exit mobile version