। सुधागड-पाली । वार्ताहर ।
पालीतील जुन्या बस स्थानक नाक्यावर सीसीटीव्ही लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या वाढदिवसा निमित्त स्वीकृत नगरसेवक सुधाकर मोरे यांच्या सौजन्याने हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
पाली नगराध्यक्षा गीता पालरेचा, जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, उपनगराध्यक्ष आरिफ मनियार राष्ट्रवादी काँग्रेस पाली शहराध्यक्ष अभिजीत चांदोरकर यांच्या हस्ते या सीसीटीव्ही कॅमेर्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते. या सीसीटीव्हीमुळे जुन्या बस स्थानक नाक्यावर तिन्ही बाजूंना करडी नजर राहणार आहे. यामुळे पोलिसांना देखील फायदा होणार आहे.