दिनेश पवार सेवानिवृत्त

। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील मोरा येथील ग्राइंडवेल नॉर्टन लिमिटेड कंपनीतून दिनेश पवार हे 31 वर्षे प्रदीर्घ सेवेतून बुधवार (दि. 19) निवृत्त झाले. दिनेश पवार हे 1991 साली ग्राइंडवेल नॉर्टन कंपनीत मेंटेनन्स डिपार्टमेंटमध्ये रुजू झाले. सेवेच्या कालावधीत अनेक सुधारणा केल्या, त्याबद्दल त्यांना कंपनीने त्यांना वेळोवेळी गौरविले आहे. सन 2003 साली त्यांना राज्यपाल एस एम कृष्णा यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात कंपनीचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version