धुतूमध्ये “दिशा विचारधारेची, चौफेर विकासाची”

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील धुतूम ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन आघाडीने मागील पाच वर्षात चौफेर विकासकामांचा तडाखा लावल्याने या विकासकामांच्या जोरावर पुन्हा एकदा हिच परिवर्तन आघाडी बाजी मारणार असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे यावेळी शेतकरी कामगार पक्ष, भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी पक्ष व म.न.से. पुरस्कृत परिवर्तन आघाडीने नवीन चेहर्‍यांना संधी देत एक वेगळा संदेश तालुक्यात दिला आहे. सौ. सीमा कांती ठाकूर या थेट सरपंचपदाच्या उमेदवार असून त्यांच्या नेतृत्वाखाली लढत आहेत.


दिशा विचारधारेची चौफेर विकासाची व देत असलेल्या वचनपुर्तीची अशी घोषण देत ही परिवर्तन आघाडी मार्गक्रमण करीत आहे. सन २०१७ ते २०२२ या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये देखिल आपल्या ह्याच आघाडीमार्फत ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दणदणीत विजय प्राप्त केलेला आहे. मागील निवडणुकीच्या वेळी जाहीर केलेल्या वचननाम्यातील १८ विकास कामापैंकी बहुतेक कामे पूर्ण केलेली आहेत.त्यामध्ये विशेष उल्लेखनिय काम म्हणजे घनकचरा निर्मूलन प्रकल्प कि ज्या प्रकल्पाची संपूर्ण राज्यभर दखल घेतली गेली. तसेच यासाठी आपल्या ग्रामपंचायतीला विशेष सन्मानही मिळालेला आहे. ग्रामपंचायत धुतूम निवडणूकीत शेतकरी कामगार पक्ष, भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी पक्ष व म.न.से. पुरस्कृत परिवर्तन आघाडीने आपला वचननामा देखील जाहिर केला आहे.

सिमा कांती ठाकूर थेट निवडणूकीद्वारे परिवर्तन आघाडी पुरस्कृत सरपंच पदाची निवडणूक लढवित आहेत. विकास कामांचा हाच ध्यास घेऊन २०२२ च्या निवडणूकीस सामोरे जाताना आम्ही सर्व उमेद धुतूम गावातील सर्व मतदार बंधु-भगिनींना आवाहन करू इच्छिेतो की, आपण आपले बहुमोल मत देऊन या निवडणूकीमध्ये परिवर्तन आघाडीच्या सरपंचाच्या उमेदावारीसह सर्व सदसयांना भरघोस मतानीं निवडून देऊन पुढील पाच वर्षामध्ये विविध विकासाची कामे करण्याची आमची इच्छा असल्याचा विश्‍वास सीमा कांती ठाकूर यांनी व्यक्त केला. विविध प्रकारची कामे करण्याची व गावाच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही सर्वजण, आपल्या परिवर्तन आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपणा सर्व सहकारी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने प्रामाणिकपणे व एकजुटीने राहून सनदशिरमार्गाने आपल्या गावाचा सर्वागिण विकास करण्यासाठी प्रयत्नशिील राहू अशी ग्वाही देखील थेट सरपंचपदाच्या उमेदवार सीमा ठाकूर यांनी दिली आहे.

परिवर्तन आघाडी पुरस्कृत खालील उमेदवार सदस्य पदाची निवडणूक लढवित आहेत.
प्रभाग क्रमांक 1)
1.श्री. प्रकाश काशिनाथ ठाकूर
2.श्री. व्रिकम गणपत ठाकूर

  1. सौ.प्रसिद्धा सुनिल ठाकूर
    प्रभाग क्र.2
    1.श्री.जयेश रघुनाथ घरत
    2.सौ.करिष्मा रुपेश ठाकूर
    3.सौ.समिता दत्ता ठाकूर
    प्रभाग क्र.2
  2. श्री. धनाजी महादेव ठाकूर
  3. सौ. श्रुती करण ठाकूर

मागील पाच वर्षामध्ये केलेली महत्वाची विकासकामे खालीलप्रमाणे
गावामध्ये महत्वाचे ठिकाणी सी.सी.टी.व्ही कॅमेेरे बसविले आहेत.
मोठ्या तलावाचे सुशोभिकरण व बसण्यासाठी व्यवस्था
मराठी शाळेची इमारत उभारली.
एक व्यायामशाळा व सुसज्ज जिम
म्हैसेश्‍वर मंदिर सुशोभिकरण
गावातील, गावाबाहेरील गटारांची कामे
महिला बचतगट सक्षिमिकरण व त्याद्वारे विविध प्रकारची मदत
गावठाण विस्ताराचे महत्वाचे काम आपण केलेले आहे. तसेच लॉजीस्टीक पार्कसाठी विरोध केला आहे.
वृक्ष लागवड व संगोपन
अशी अजुनही अनेक कामे आपण केलेली आहे. त्यासाठी अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सर्वात महत्वाचा आदशर्र् ग्रामपंचायत पुरस्कार ही आपले ग्राम पंचायतीस प्राप्त झाला आहे. यामध्ये ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपता संपता सर्वांचे प्रेरणास्थान व ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय हरिश्‍चंद्र कृष्णा ठाकूर (काविळवाले) यांच्या नावाची कमान गावाच्या वेशीवर उभारण्यात आली. याद्वारे अप्पांच्या प्रती असलेले प्रेम जतन करण्याचे महत्वाचे काम केलेले आहे.

पुढील पाच वर्षामध्ये आमचा वचननामा खालीलप्रमाणे
गावठाण विस्तार योजनेच्या या अगोदर तयार केलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करून मंजूरी मिळविणे
महिला सक्षमीकरण व त्यासंबंधीत विविध योजना राबवून महिला चत गटाना जास्तीत जास्त मदत मिळविणे
गुरूचरणाची मोकळी जागा व त्यावरील सरकारी हस्तक्षेप याबाबतच्या हालचालींवर लक्ष ठेवणे
सौर ऊर्जा निर्मितीबाबत स्वतंत्र योजना राबविणे
आपल्या ग्रापमंचायत हद्दिमध्ये होत असलेल्या रेल्वे स्टेशनमधील व परिसरातील विविध प्रकारचे छोटे – मोठे व्यवसाय प्रकल्पग्रस्त व नागरीकानांच मिळावेत. यासाठी सर्वांच्या सहकार्यांने प्रयत्न करणे. तसेच महत्वाचे म्हणजे रेल्वे स्टेशनच्या नावासाठी प्रयत्यनशिल राहणे
मराठीशाळा १०० टक्के डिजीटल करणे
विजपुरवठा सुरळित रहावा व पुर्ण दाबाने विजपुरवठा मिळावा, यासाठी आणखी एका ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था करणे
गावातील सर्व नागरीकांना वेळेवर व मुबलक पाणीपुरवठा व्हावा या दृष्टीने सद्या अस्तित्वात असलेल्या अनेक जलवाहिन्यांचे जाळे कमी करून एक वेगळी यत्रंणा राबवून सुधारीत जलवाहिनी टाकणे.
गावातील अपंगव्यक्ती व विधवाभगिनी यांना शासकीय पातळीवरील योजनांचा पुरेपुर फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू.
हुतात्मा मैदानासाठी सिडकोच्या माध्यमातून निधी मिळवून हुतात्मा मैदान अद्यायावत करण्यावर विशेष भर दिला जाईल.
गावातील अंतर्गत रस्त्यांची दुरूस्ती व स्वच्छता योग्य ठेवण्यासाठी नियोजनबद्ध काम केले जाईल.

Exit mobile version