दिव्यांग दिन उत्साहात साजरा

। माथेरान । वार्ताहर ।

माथेरानमध्ये आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. दिव्यांग दिनानिमित्त माथेरान नगर परिषदेतर्फे दिव्यांग बांधवांना आर्थिक सहाय्य वाटप कम्युनिटी सेंटर येथे सायंकाळी 04-00 वाजता कार्यक्षम मुख्याधिकारी तथा उत्तम प्रशासक राहुल इंगळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी माथेरानचे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव, उद्योजक नितीन शहा, माथेरान लेखापाल अंकुश इचके, भारत पाटील, सदानंद इंगळे, अमूधन, ज्ञानेश्‍वर सदगीर तसेच नगरपरिषद कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version