| रायगड | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील आरसीएफ वसाहतीतील विशेष मुलांच्या शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना गोंधळपाडा येथील हॉटेल ताजने खास निमंत्रित करुन त्यांचा आगळावेगळा पाहुणचार केला. या पाहुणचाराने सारेच सुखावले होते. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आत्मनिर्भर पालक असोसिएशन संचलित विशेष मुलांचे व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्राचा ध्वजवंदनाचा कार्यक्रम अलिबागमधील आरसीएफ कॉलनीत संपन्न झाला. यावेळी शाळेचे पदाधिकारी शिक्षक व विद्यार्थी हजर होते. या मुलांना समाजाच्या विविध गोष्टींमध्ये सामावून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याच्या हेतूने ताज अलिबाग रिसॉर्ट अँन्ड स्पा यांच्याकडून भेट देण्याचे आमंत्रण आले होते. त्यानुसार शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता देसाई यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक इतर सहाय्यक व पदाधिकारी यांनी प्रथमच पंचतारांकित हॉटेलला भेट देत तेथील पाहुणचाराचा आनंद लुटला.







