पक्षांतर्गत निवडणुकीनंतरचे पुरावे गायब

जितेंद्र आव्हाडांची माहिती

| मुंबई | वृत्तसंस्था |

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीनंतरचे पुरावे गायब झाले आहेत, असे वक्तव्य शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदार अपात्रता सुनावणीवेळी केले आहे. महत्त्वाची कागदपत्रे कपाटात ठेवली होती, ती गायब झाली आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. त्यानंतर आता राहुल नार्वेकर यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अपात्रता प्रकरण प्रलंबित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मागच्यावर्षी फूट पडली. अजित पवार गट आणि शरद पवार गट निर्माण झाले. शरद पवार गट विरोधी बाकांवर बसतो, तर अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या सुनावणीवेळी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महत्त्वाची कागदपत्रे कपाटातून गायब झाल्याची धक्कादायक माहिती दिली आहे.

Exit mobile version