बेपत्ता प्रमोद वायंगणकर यांची घरवापसी

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील तळेरे विकास सेवा संस्थेचे मतदार असलेले प्रमोद वायंगणकर आपल्या घरी परतले आहेत. नुकताच त्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात हजेरी लावली. आपल्या वैयक्तिक कारणामुळे आपण पुणे येथे गेलं असल्याचे त्यांनी जबाबात म्हटले आहे.
बँक निवडणूक नुकतीच झाली या निवडणुकीतील कणकवली विकास संस्था मतदार संघात मधून प्रमोद वायंगणकर यांना मतदानाचा हक्क होता, मात्र मतदाना पूर्वी 20 डिसेंबरला प्रमोद वायंगणकर हे बेपत्ता झाले होते अशी माहिती त्यांचे भाऊ शरद वायंगणकर यांनी येथील पोलिसात नोंदवली होती.
शिवसेनेच्या वतीने निवेदनही देण्यात आले होते. प्रमोद वायगंकर बेपत्ता झाल्यामुळे उलटसुलट चर्चाही रंगू लागल्या होत्या. बँकेचे मतदान 30 डिसेंबरला झाले 31 ला निकाल जाहीर झाला. प्रमोद वायंगणकर हे आज येथील पोलिस ठाण्यात हजर झाले. बँकेच्या कर्जाला कंटाळून आपण पुणे येथे गेलो होतो असे त्यांनी पोलिस जबाबात म्हटले आहे. आपल्यावर कोणाचाही दबावही नसल्याचे म्हटले आहे.

Exit mobile version