| अलिबाग | वार्ताहर |
आदर्श पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात तालुक्यातील शाखा कर्मचाऱ्यांसाठी पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी कर्मचाऱ्यांवर व कुटुंबीयांवर आपत्ती येऊ नये व कोणती काळजी घ्यावी यासाठी रायगडचा युवक फाउंडेशनच्या सहयोगाने आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आपत्ती व्यवस्थापन तज्ञ डॉ. जयपाल पाटील यांनी उपस्थितांना आपल्या घरातील गॅस सिलेंडर, वीजेची साधने, गिझर फ्रिज, याबाबत कोणती काळजी घ्यायची, तसेच आपत्तीच्या वेळी लागणारे शासकीय दूरध्वनीची माहिती, दामिनी ॲपची माहिती, साप-विंचू चावल्यावर काय करावे, 108 रुग्णवाहिका पाचारण करावे याची माहीती देण्यात आली. यावेळी डॉ. अजित बर्गे यांनी सी.पी.आर. चे प्रात्यक्षिक तर आरसीएफचे सतीश हिरगुडे, प्रसन्न श्रीवास्तव, अश्विन जॉन, नारायण जाधव, हेमंत पाटील यांनी आग विझवण्याचे प्रात्यक्षिके करुन दाखवली. यावेळी 220 कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेहा पोंगडे यांनी मानले.