। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यतील नेरळजवळील धामोते येथील डिस्कव्हर रिसॉर्टच्या व्यवस्थापकाने कामगारांना 12 जानेवारी रोजी अचानक कामावरून कमी केले आहे. यामुळे अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला असून, आम्हाला न्याय मिळावा यासाठी कामगारांनी धामोते-डिस्कव्हर रिसॉर्टच्या व्यवस्थापकाच्या विरोधात 26 जानेवारीपासून रिसॉर्टच्या समोर उपोषण सुरू होते. उपोषणच्या तिसर्या दिवशी उपोषणाला बसलेल्या सर्व पाच कामगारांना पुन्हा कामावर घेतले आहे.
कर्जत तालुक्यातील धामोते येथील डिस्कव्हर रिसॉर्ट येथे काम करणार्या काही कामगारांना रिसॉर्ट व्यवस्थापकाने कोणत्याही प्रकारे पूर्वसूचना न देता अचानक कामावरून काढण्यात आले होते. याविरोधात काम करणारे भरत हिरू कराळे, भास्कर दत्तू विरले, धनेश शरद म्हसकर, नरेश खंडू विरले, अनंता दत्तू विरले, धर्मा शिवराम पेरणे हे कामगार रिसॉर्टच्या गेट समोर उपोषण सुरु केले होते.
उपोषणानंतर डिस्कव्हर व्यवस्थापन नरमले निलंबित कर्मचार्यांना घेतले कामावर
