| मुंबई | प्रतिनिधी |
भुजबळ साहेब वयाने, कर्तृत्वाने मोठे आहेत. त्यांच्याकडे विनम्रपणे मागणी करते, गैरसमज नसावा. मला प्रांजळपणे सांगायचे आहे की, आपली जी मागणी आहे आणि ती ज्या व्यासपीठावर करता ती बंद दरवाजामागे किंवा कॅबिनेटमध्ये केली तर बरे होईल, असा सल्ला खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री छगन भुजबळ यांना दिला.
मराठा आरक्षणावरुन मागच्या काही दिवसांपासून वातावरण पेटले आहे. छगन भुजबळ आणि मनोज जरांगे हेे एकमेकांवर आरोप-प्रत्याराोप करत आहेत. त्या अनुषंगाने सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
महाराष्ट्रामध्ये दुर्दैवी गलिच्छ राजकारण सुरू आहे. भुजबळांना महत्त्वाचे पद मिळाले आहे. त्यांनी सरकारमध्ये चर्चा करायला पाहिजे. दूषित होणाऱ्या या वातावरणाला जबाबदार खोके सरकार आहे. 200 आमदार असताना मंत्र्याला बोलायला बाहेरचे व्यासपीठ लागते, असा टोला सुळेंनी लगावला.