शिक्षकांच्या समस्यांसंदर्भात चर्चा

। माणगाव । प्रतिनिधी ।

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा रायगडच्यावतीने गुरूवारी (दि.4) रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांबाबत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण राजिप प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर राजेश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, त्याअगोदर रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या या प्रलंबित समस्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवारी (दि.1जुलै) शिक्षण अधिकारी प्राथमिक रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांनी शिक्षक परिषद पदाधिकारी यांना बोलाविले होते. त्याप्रमाणे राजेश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा रायगडच्या पदाधिकारी यांनी रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आले.

यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, प्रशासन अधिकारी कवीतके, कनिष्ठ प्रशासन अधिकारी जाधव, राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे, जिल्हा अध्यक्ष विजय पवार, गजानन देवकर, उदय गायकवाडे, जगदिश चवरकर, सुशील वाघमारे, वैभव पिंगळे, राजू नाईक, देवानंद गोगर, सचिन खोपडे, सुनिल साळवी, महेंद्र गायकवाड, बाळासाहेब बारगजे, विजय मेस्त्री आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version