गृहनिर्माण संस्थांचे अभिहस्तांतरणा संदर्भात चर्चा सत्र

| पनवेल | वार्ताहर |

सिडको निर्मित नवी मुंबई व पनवेल क्षेत्रातील सिडको अंतर्गतच्या मावेजा रकमेची वसुली प्रलंबित असलेल्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र, भाडेपट्टा खत, अभिहस्तांतरण करण्याबाबत एकता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू होता, त्यास यश येऊन राज्य सरकारने सिडकोतर्फे अश्या इमारतींसाठी नवी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे.

जास्तीत-जास्त नागरिकांनी, विकासकांनी आणि गृहनिर्माण संस्थांनी या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टीने एकता सामाजिक संस्थेच्या वतीने स्वस्तिक प्लाझा, सेक्टर 11 कामोठे येथे जनजागृतीपर चर्चासत्रात आयोजित करण्यात आले होते. यात गृहनिर्माण संस्थांच्या अनेक प्रश्नांना पनवेल सिडको हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष कुंडलिक काटकर, तसेच याविषयातील जाणकार मुकूंद शितोळे, काशिनाथ जाधव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

कामोठे मधील 70 पेक्षा जास्त तसेच करंजाडे मधील काही गृहनिर्माण संस्थांनी यात सहभाग नोंदवला. एकता सामाजिक संस्थेने शासनाकडे यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल सर्वांनी संस्थेचे अध्यक्ष अमोल शितोळे यांचे आभार मानले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अल्पेश माने, गौरव पोरवाल, बाळासाहेब सकपाळ, अजिनाथ सावंत आदि उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी कामोठे मधील स्वस्तिक प्लाझा गृहनिर्माण संस्थेचे खजिनदार हिरा भट्ट आणि सर्व पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

जो पर्यंत कामोठे मधील सर्व इमारतींचे अभिहस्तांतरण होत नाही तो पर्यंत एकता सामाजिक संस्था मार्फत हे रहिवाशांना मार्गदर्शन केले जाईल तसेच काही इमारतीचे ट्राय पार्टी करार झाला नसल्याने त्यांना सिडकोला दोनदा डेव्हलपमेंट चार्ज भरावा लागत आहे. सिडको क्षेत्रात घरे घेताना बिल्डरने फसवणूक केल्याने रहिवाशांना नाहक भुर्दंड सोसावा लागतो याबद्दल लवकरच सिडको आणि शासनाकडे पुन्हा नव्याने पाठपुरावा करू

अमोल शितोळे
Exit mobile version