महायुतीच्या बैठकीत नाराजी नाट्य!

बारणे यांचा प्रचार करणार नाही, आरपीआय गटाची भूमिका

| पिंपरी | वार्ताहर |

पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या महायुतीच्या बैठकीत नाराजी नाट्य बघायला मिळालं. आरपीआय आठवले गटाच्या शहराध्यक्षाला व्यासपीठावर न बोलवल्याने आणि त्यांचा नामोल्लेख न केल्याने आरपीआय आठवले गटाने काढता पाय घेत पदाधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त केली. जोपर्यंत रामदास आठवले यांचा आदेश येत नाही. तोपर्यंत आम्ही श्रीरंग बारणे यांचा प्रचार करणार नाहीत, अशी भूमिका आरपीआय गटाच्या पदाधिकार्‍यांनी घेतली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी आज एक बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीसाठी अजित पवार, चंद्रकांत पाटील, उदय सामंत यांच्यासह शहराध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. दरम्यान, या बैठकीदरम्यान नाराजी नाट्य बघायला मिळालं. आर.पी.आय गटाचे शहराध्यक्ष यांचा नामोल्लेख आणि व्यासपीठावर बसण्यास न बोलावल्याने पदाधिकारी यांनी या बैठकीतून काढता पाय घेत नाराजी व्यक्त केली. शेजारून जाणार्‍या सामंत यांना या आरपीआय आठवले गटाच्या नाराजीची कुणकुण लागल्याने त्यांनी पदाधिकार्‍यांची भेट घेतली आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. सामंत यांनी मध्यस्थी करत उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याशी शहराध्यक्ष आणि पदाधिकार्‍यांची भेट घडवून या नाराजी नाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Exit mobile version