| माथेरान | प्रतिनिधी |
शैक्षणिक क्षेत्रात आपल्या शिक्षणासोबतच भविष्यात जी काही उत्तुंग स्वप्ने रंगवली आहेत. त्यासाठी अधिकाधिक महत्व देऊन आणि विशेष म्हणजे आई-वडिलांच्या स्वप्नांची पूर्तता करून बी.डी.एस.परीक्षेत उत्तीर्ण होऊन दिशा जाधव हिने डॉक्टर पदवी प्राप्त केली आहे. त्यामुळे तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. माथेरानची कन्या दिशा हिने खेड-रत्नागिरी येथील योगिता डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेऊन बी.डी.एस.परीक्षा उत्तीर्ण केली. सुरुवातीला तिचे शालेय शिक्षण माथेरान व बदलापूर याठिकाणी झाले होते. माथेरान सारख्या दुर्गम भागातील या कन्येने माथेरानच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. शालेय जीवनात नेहमीच हुशार आणि अभ्यासक्रमात अग्रेसर भूमिका त्यांनी पार पाडली आहे. तिचे वडील योगेश जाधव हे शिक्षक असून आई प्रगती जाधव या उच्चशिक्षित महिला आहेत. पालकांचे आणि शिक्षकांच्या उत्तम मार्गदर्शनामुळे आपण जिद्दीने ह्या बी.डी.एस. परीक्षेत उत्तीर्ण झालो आहोत. कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि मेहनत घेतल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचे देखील दिशा जाधव यांनी सांगितले.
दिशा जाधवला डॉक्टर पदवी प्राप्त
