सत्ताधार्‍यांकडून जनतेचा भ्रमनिरास

आम.जयंत पाटील यांचा हल्लाबोल,पुरोगामी युवक संघटनेचा मेळावा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीमध्ये चारही पक्षांबाबत महाराष्ट्रातील जनतेमध्ये मतदारांमध्ये भ्रमनिराश झाला आहे. कोणाकडे विश्‍वासाने बघावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रामुख्याने ओबीसी बहूजन समाज छोटे छोटे समाज यांना समाजांना बाजूला करुन ठराविक लोकांची मक्तेदारी निर्माण झाली असून ती मोडीत काढण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस आम.जयंत पाटील यांनी सोमवारी (29 नोव्हेंबर) अलिबाग येथे केले. अलिबाग येथील पीएनपी नाट्यसभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शेकापच्या पुरोगामी युवक संघटनेच्या राज्यस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री मीनाक्षी पाटील, ज्येष्ठ नेते प्रा. एस. व्ही. जाधव, माजी आमदार पंडित पाटील, कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड. राजेंद्र कोरडे, बाबासाहेब कारंडे, बाळासाहेब काटकर, चंदकांत देशमुख, नानासाहेब लिगाडे, उमाकांत राठोड, राहूल देशमुख आदींसह राज्यभरातून शेकापक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होेते. पुरोगामी युवक संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ बाबासाहेब देशमुख सचिवपदी चंद्रकांत चव्हाण, डॉ अनिकेत देशमुख मध्यवर्ती समितीत दादासाहेब बाबर सांगोला तालुका चिटणीस शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी शेकापचे ज्येष्ठ नेते दिवंगत गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ बाबासाहेब देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. तर सेक्रेटरीपदी चंद्रकांत चव्हाण, औरगांबाद यांची निवड करण्यात आली. सांगोला तालुका चिटणीस दादासाहेब बाबर तर शेकाप मध्यवर्ती समिती सदस्य म्हणून डॉ अनिकेत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी जाहीर केले. ही निवड जाहीर होताच राज्यभरातील युवक कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करुन अभिनंदन केले.

आ. जयंत पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, शेकापची पक्ष संघटना आहे ती मजबूत करायची आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आबासाहेबांची आमदारकी, कारकिर्द वाढविली ती सांगोल्यातील शेकापच्या कार्यकर्त्यांनी. महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीमध्ये चारही पक्षांबाबत महाराष्ट्रातील जनतेमध्ये मतदारांमध्ये भ्रमनिराश झाला आहे. कोणाकडे विश्‍वासाने बघावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रामुख्याने ओबीसी बहूजन समाज छोटे छोटे समाज यांना समाजांना बाजूला करुन ठराविक लोकांची मक्तेदारी निर्माण झाली असून ती मोडीत काढण्याची गरज आहे. वेगवेगळे पर्याय तपासून पहात आपला कार्यकर्ता उभा करण्यासाठी आत्मपरिक्षण करत असून त्यात यशस्वी होऊ असा विश्‍वास आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

सांगोला मोठे शक्तीकेंद्र
आपल्याला थोडे कष्ट करावे लागतील. नवीन कार्यकर्ते निर्माण करावे लागतील. अनेक घराणे आपली ताकद होती आपला आत्मा होता, आपल्या विचारांच्या नेत्यांसोबत संपर्क करावे लागतील. पश्‍चिम महाराष्ट्रात सांगोला हे मोठे शक्ती केंद्र आहे. स्वतः सांगोल्यात जाऊन तालुका पिंजून काढू. सर्व कार्यकत्यांसोबत संपर्क वाढवण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला. सांगोल्याचे शेकापचे युनिट हे सोने आहे. ते दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही. आबासाहेबांच्या पुण्याईवर त्यांच्यापेक्षा अधिक मते शेकापक्षाच्या नव्या उमेदवाराला मिळतील असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. सांगोल्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या जागा शेकापक्ष जिंकेल असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपला प्रत्येक उमेदवार हा शेकापक्षाच्या विचारांशी बांधील असला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. पंचायत समितीचा सभापती हा आमदारापेक्षाही अधिकाराने मोठा आहे. त्याने सतत संपर्क ठेवला पाहिजे. कार्यालयात नियमित जाऊन बसायला हवे, पत्रव्यवहार, कागदोपत्रांचा अभ्यास करायला हवा. आता सगळे अधिकारीच राज्य करीत असल्याची वाईट परिस्थितीत आहे.

Exit mobile version