रायगड जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी जाहीर
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
बंडखोरी करून शिंदे गटाला समर्थन देणाऱ्या आमदार महेंद्र दळवी यांची जिल्हा प्रमुख आणि राजा केणी यांची तालुका प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आल्या नंतर आज महेंद्र दळवी समर्थक महिला पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने रायगड जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
त्यानुसार मेघना चव्हाण – शहर संघटक (पेण शहर), वर्षा कोळी विभाग संघटक (पेण तालुका – शिहू विभाग), संगीता खोडागळे • तालुका संघटक (सुधागड – पाली तालुका), वर्षा सुरावकर – तालुका संपर्क संघटक (सुधागड तालुका), रचना हजारे – शहर संघटक (सुधागड – पाली शहर), अश्विनी रुईकर – विधानसभा संपर्क संघटक (पेण – सुधागड विधानसभा), दर्शना जवके – उपजिल्हा संघटक (पेण – सुधागड), स्नेहल देवळेकर – तालुका संघटक (अलिबाग तालुका), राखी खरीवले – शहर संघटक (अलिबाग शहर), तनुजा पेरेकर – संपर्क संघटक (अलिबाग शहर), राजश्री मिसाळ – तालुका संघटक (मुरूड तालुका), सुहासिनी सुभेदार – शहर संघटक (मुरूड शहर), प्रविता पत्की – शहर संघटक (नागोठणे शहर), दीप्ती दुर्गावले – विभाग संघटक (नागोठणे), प्रतिभा म्हात्रे – उपविभाग संघटक (नागोठणे) यांची , नियुक्ती करण्यात आल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.