पनवेल | वार्ताहर |
शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत (पनवेल विधानसभा) यांच्या नेतृत्वाखाली राणे यांच्याविरोधात खारघर येथे जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच नारायण राणे यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी खारघर पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले.
या आंदोलनास जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्यासह उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, उपमहानगर प्रमुख दिपक घरत,यतीन देशमुख, सर्व शहर प्रमुख, उपशहर प्रमुख , युवासेनेचे उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत, विधानसभा अधिकारी पराग मोहिते, सर्व शहर अधिकारी, महिला आघाडीच्या विधानसभा संघटिका रेवती सकपाळ, उपतालुका संघटिका टीया अरोरा-धुमाळ, उपमहानगर संघटिका सौ. रीना पाटील, शहर संघटिका सौ. अपूर्वा प्रभू, विभाग संघटिका संगीता राऊत आदी शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.