| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत शहरातील सखी ग्रुप आयोजित गृहोपयोगी उत्पादनांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. रविवारी शनि मंदिराच्या रवि किरण सभागृहात प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.या प्रसंगी सखी ग्रुपच्या मीना प्रभाळकर, वनिता सोनी, तन्वी जोशी, कविता राठी, प्रज्ञा परांजपे, सपना शहा उपस्थित होत्या.
प्रदर्शनात एकूण 25 महिलांनी आपापले स्टॉल मांडले होते. फॅन्सी दागिने, साड्या, ड्रेस मटेरिअल, पूजेच्या वस्तू, विविध पर्सेस, घर सजावटीच्या वस्तू, सौंदर्य प्रसाधने आणि विविध खाद्यपदार्थ असे गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल या प्रदर्शनात पाहायला मिळाले. सर्वांची अशीच साथ लाभल्यास भविष्यात अशी अधिकाधिक प्रदर्शने भरवून महिला उद्योजिकांना सक्षम व्यवसायासाठी संधी उपलब्ध करून देण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.