मुंबईच्या ताफ्यात नाराजी?

| मुंबई | प्रतिनिधी |

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी हार्दिक पांड्याचा मुंबई इंडियन्सच्या संघात समावेश झाला आहे. हार्दिकने देखील घरवापसी झाल्यामुळे आनंद व्यक्त केला. मात्र, आता हार्दिकच्या पुनरागमनामुळे मुंबईच्या ताफ्यात नाराजीनाट्य सुरू असल्याची चर्चा आहे. मुंबईचा घातक गोलंदाज जसप्रीत बुमराहने याबाबत संकेत दिले. खरं तर, रोहित शर्मानंतर जसप्रीत मुंबईचा कर्णधार होईल हे जवळपास स्पष्ट होते. पण, आता पांड्याची घरवापसी झाल्यानंतर बुमराहची अडचण झाली असल्याची चर्चा आहे.

अशातच त्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी ठेवून बोलकी प्रतिक्रिया दिली. लक्षणीय बाब म्हणजे एका वाक्यातच बुमराहने बरेच काही सांगितले. ‌‘कधी कधी शांत राहणे हेच सर्वोत्तम उत्तर असते’, असे बुमराहने म्हटले आहे.

Exit mobile version