| पनवेल | वार्ताहर |
दिवाळी सणानिमित्त विद्युत रोषणाई करण्यावरुन एका सोसायटीच्या दोन गटामध्ये भांडणे झाल्याची घटना तळोजा वसाहतीमध्ये घडली आहे. येथील सेक्टर – 9 या ठिकाणी असलेल्या पंचानंद हाऊस या सोसायटीमध्ये दिवाळी सणानिमित्त मधल्या भागात विद्युत रोषणाई करण्यात येत होती. या रोषणाईला सोसायटीतील विशिष्ट गटाने विरोध केला. यातून तेथील काही महिला रहिवाशांना अश्लिल भाषेत धमकाविण्यात सुद्धा आले. याबाबत या महिलांनी तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.