| पनवेल | प्रतिनिधी |
दिवाळी सणाच्या पार्श्ववभूमीवर सर्वत्र झगमगाट सुरु आहे. दिव्यांची आकर्षक रोषणाई ही आता पनवेलची एक वेगळी ओळख होत आहे. यामध्ये दिवाळी निमित्त पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालय, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, प्रभाग कार्यालयांना , विविध कार्यालये, चारही प्रभागातील चौक, रस्ते यांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे शहरातील टिळक रोड परिसर हा केदार बिल्डकॉनमुळे झगमगला असून, अनेकजण या ठिकाणी उभे राहून या रोषणाईचा आनंद घेत आहेत. तर तरुण वर्ग सेल्फी व व्हिडिओ काढून आपला आनंद द्विगुणित करीत आहेत. या भागातील नागरिक तसेच इतर अनेकजण या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई पाहण्यासाठी येथे गर्दी करीत आहेत व केदार बिल्डकॉनचे कौतुक करत आहेत. आकर्षक बांधकाम, वाजवी दर व ग्राहकाचे समाधान या तत्त्वावर केदार बिल्डकॉनचे पनवेल शहर, नवीन पनवेल, वाशी, मुंबई या ठिकाणी मोठं मोठे प्रोजेक्ट कार्यान्वित आहेत.







