गणेशोत्सवापूर्वी प्रवासात विघ्न

आंबेत पुलाच्या कॉलमचा भाग कोसळला

| महाड | प्रतिनिधी |

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आंबेत पुलाच्या दुरुस्तीचे काम गेल्या काही महिन्यापासून सुरू आहे. पुलाचे काही कॉलम नादुरुस्त झाल्याने कॉलम दुरुस्तीचे काम सुरू असताना पुलाच्या जुन्या कॉलमचा काही भाग नवीन बांधकामावर कोसळल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. हा पूल 15 सप्टेंबरपूर्वी वाहतुकीला सुरू करण्यात होता. परंतु, कॉलमचा स्लॅब कोसळल्यामुळे गणेशोत्सवापूर्वी पूल सुरू होण्याची शक्यता कमी असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

या पुलामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, खेड, दापोली व अन्य गावांना सोयीचा; परंतु दुरुस्तीच्या कारणावरून हा पूल वाहतुकीला गेल्या काही महिन्यांपासून बंद करण्यात आल्याने स्थानिक रहिवासी व प्रवाशांची गैरसोय झाली होती. लवकरात लवकर पुलाचे काम पूर्ण होऊन हा पूर्व वाहतुकीला सुरू होईल असे वाटत असताना ही दुर्घटना घडली. कॉलमचा स्लॅप कोसळल्याने हा पूल गणपती पूर्वी वाहतुकीस सुरू करण्याची शक्यता मावळली आहे. यामुळे गणेशोत्सवात भक्तांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. पूल दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Exit mobile version