| माणगाव । वार्ताहर ।
काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिन काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष पंकज तांबे यांनी यांनी माणगाव तालुक्यात अनोख्या पद्धतीने साजरा करीत तालुक्यातील विविध शेतकर्यांच्या बांधावर जावून त्यांच्या व्यथा ऐकत त्यांचे दुखः समजून घेत शेती व शेतीसाठी पूरक असणार्या व्यवसायाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी शेती मशागतीतील अडचणी शेतकर्यांनी यावेळी उस्फूर्तपणे बोलताना मांडल्या.
तालुक्यातील कळमजे येथील शेतकर्यांनी गोद नदीच्या पाण्यावर केलेल्या मिरची, भेंडी, वांगी, कारली, कलिंगड, या उन्हाळी भाजीपाला व कडधान्ये शेतीला प्रत्यक्ष भेट देवून त्यांनी पाहणी करून शेतकर्यांना मार्गदर्शन केले. यावेळी स्वप्नील शिर्के, संभाजी गायकवाड मुकुंद वाढवळ, नथुराम खडतर, राम पडवळ, वृषाली पडवळ, आनंद वाढवळ, सतीश वाढवळ, मनोहर वाढवळ, हरीश्चंद्र राऊत, सुधीर वाढवळ, तेजेश वाढवळ, वृषभ वाढवळ, महादेव वाढवळ, रमेश वाढवळ यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
शेतकर्यांनी मांडल्या शेताच्या बांधावर व्यथा
