ज्योती शांती निकेतन संस्थेचा उपक्रम
। पाली । वार्ताहर ।
सध्या सगळीकडेच हुडहुडी भरणारी थंडी वाढली आहे. अशा गुलाबी थंडीत कुडकुडणार्या गरजूंना पाली येथील ज्योती शांती निकेतन संस्थेच्या वतीने मायेची ऊब देत त्यांना 100 ब्लँकेटचे वाटप केले.
पाली शहरातील गरीब, विधवा महिला, अपंग तसेच बसस्थानक, रुग्णालय उघड्यावर रात्र काढणार्या गरजूंना संस्थेच्या वतीने ब्लँकेट भेट देत मदत करण्यात आली.
यावेळी माजी सभापती साक्षी दिघे, संस्थेचे पदाधिकारी अंबादास खेडकर, सुनीता खेडकर आदींसह सभासद उपस्थित होते. संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाचे सध्या सगळीकडे कौतुक केले जात आहे. येथील ज्योती शांती निकेतन सामाजिक संस्था ही नेहमीच सामाजिक क्षेत्रात तसेच गरजूंच्या मदतीसाठी सदैव अग्रेसर असते.