| कोर्लई | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मुरुड तालुका डायरेक्टरपदी निवड तुफैल दामाद यांची निवड करण्यात आली आहे. रायगड जिल्हा डायरेक्ट व्हॉलीबॉल कार्यकारिणीची सभा रेवदंडा येथे नुकतीच पार पडली. यावेळी ही नियुक्ती करण्यात आली.
दरम्यान, तुफैल दामाद हे क्राईम इन्व्हेस्टिगेशन बोर्ड (दिल्ली) महाराष्ट्र सचिव, वाहतूक सुरक्षा दल, नागरिक संरक्षक (आर.एस.पी.) संघटनेचे उपसमादेशक, राष्ट्रीय हिंदी समाचार पत्राचे सदस्य, व्हेंचर फाऊंडेशनच्या राष्ट्रीय सल्लागार तथा टायगर फोर्सचे मुरुड तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. रेवदंडा येथे प्रसाद गोंधळी यांच्या रिसॉर्टवर कार्यवाह दीपक मोकल, प्रफुल्ल मोरे, प्रसाद गोंधळी, किशोर राठोड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत त्यांची निवड करण्यात आली.
व्हेंचर फाऊंडेशनच्या माध्यमातून कोरोना महामारीत आपली व आपल्या कुटुंबियांची पर्वा न करता अविरतपणे रुग्णसेवा देणार्या डॉक्टर्स, परिचारिका, होमगार्ड, शिक्षक, आर.एस.पी. पदाधिकारी, पथक अधिकारी, हॉटेल व्यावसायिक, होमगार्ड तसेच मुरुड तहसीलदार, महसूल विभाग व पुरवठा अधिकारी, कर्मचारी यांच्या अविरत सेवेची दखल घेऊन त्यांना मेडल व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात तसेच गोरगरीब आदिवासी बांधवांना ब्लँकेटचे वाटप तसेच तालुक्यातील नांदगाव, शिघ्रे व मुरुडमध्ये मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर आदी सामाजिक कार्यात तुफैल दामाद यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांच्या कार्याची दखल घेऊन रायगड जिल्हा डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मुरुड तालुका डायरेक्टर पदी ही निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, सदस्य, आप्तेष्ट, मित्रपरिवाराकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.