आदिवासींना शेती अवजारे वाटप

उरण ओएनजीसीची सीएसआर फंडातून मदत

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण रानसई येथील सहा आदिवासी वाड्यातील 430 कुटुंबियांना शेतीच्या कामासाठी लागणारी अवजारे आणि पाच मच्छिमार आदिवासींना ओएनजीसीकडून विनायांत्रिकी बोटीचे वाटप करण्यात आले आहे.

रानसई ग्रामपंचायत ही शंभर टक्के आदिवासी बांधवांची लोकवस्ती असणारी ग्रामपंचायत आहे. या ठिकाणी खैरकाठी, मार्गाची वाडी, बंगल्याची वाडी, खोंड्याची वाडी, सागवाडी आणि भुऱ्याची वाडी, अशा सहा आदिवासी वाड्या असून, 430 आदिवासी कुटुंबे वास्तव्यास आहेत. शेतमजुरी, भाजीपाला आणि मासेमारी करून हे आदिवासी उपजीविका करतात. त्यांना फावडा, कुदळ, पहार, घमेल, लोखंडी पंजा अशी शेतीची अवजारे आणि पाच विनायांत्रिकी बोंटीचे वाटप ओएनजीसीने सीएसआर फंडातून केले आहे. याप्रसंगी उरण ओएनजीसी प्रकल्पाच्या अधिकारी भावना आठवले, संजीव मोहन, गौरव पतंगे, अभिषेक पाटील यांच्यासह साद फाऊंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते. रानसईतील बहुतांशी आदिवासी कुटुंबे हे भाजपाला, मोलमजुरी आणि मासेमारी व्यवसाय करून उपजीविका करतात. रोजच्या वापरातील वस्तू मिळाल्यामुळे आदिवासी बांधवांनी समाधान व्यक्त केले.

Exit mobile version