महाड-पोलादपूर दुर्घटनेतील 42 मृतांच्या वारसांना मदत वाटप

1 कोटी 68 लाख रुपयांचे वितरणजिल्हाधिकारी निधी चौधरी यांची माहिती

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

महाड आणि पोलादपूर तालुक्यातील तळीये, साखर सुतारवाडी, केवनाळे या तीन दरड दुर्घटनांमध्ये 95 जणांना आपले प्राण गमवावे लागले. यापैकी 31 जणांचे मृतदेह हातीही लागले नाहीत. त्यातील 42 मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना राज्य आपत्ती निवारण निधीतून प्रत्येकी 4 लाख या प्रमाणे 1 कोटी 68 लाख रुपयांचे आतापर्यंत वितरण करण्यात आले आहे. तर राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी आणि पंतप्रधान मदत व मुख्यमंत्री मदत निधीतील मदतीचे वाटप होणार असून सदर निधी प्राप्त होताच त्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.  महाड पोलादपूर तालुक्यातील पूरपरिस्थिती आणि त्यानंतरच्या बचाव कार्याचा आढावाबाबत माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ही माहीती देण्यात आली. महाड आणि पोलादपूर तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे गतीने सुरु असून पोलादपूरमधील पंचनामे आज उशिरापर्यंत पुर्ण होतील. त्यानंतर महाड शहरात लक्ष केंद्रीत करुन रविवारपर्यंत येथील नुकसानीचे पंचनामे पुर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.  महाड व पोलादपूर तालुक्यात दि.22 व 23 जुलै 2021 रोजी अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती व दरड कोसळण्याची घटना घडली आहे.  त्यामध्ये लोकांची घरे वाहून गेली असून अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे. तसेच अनेक लोकांच्या घरामध्ये पुराचे पाणी गेल्याने खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत प्रशासनाने पंचनाम्याची कार्यवाही सुरु केली आहे.  हे पंचनामे सुरु असून दि.26 ते 29 जुलै या कालावधीत करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार प्राप्त झालेली नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे.  पंचनाम्याची कार्यवाही अजूनही सुरु आहे.

पंचनाम्याच्या कार्यवाहीत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. झालेल्या नुकसानीबाबतची दि.26 ते 29 जुलै या कालावधीतील पंचनाम्यानुसार प्राप्त माहिती पुढीलप्रमाणे महाड तालुक्यातील नुकसानीबाबतची माहिती :-  एकूण बाधित  कुटुंब संख्या 14 हजार 368 त्यापैकी पंचनामे  झालेल्या  कुटुंब संख्या 8 हजार 151 शिल्लक  पंचनामे कुटुंब संख्या 6 हजार 217 घरे अंशतः संख्या 8 हजार 121, घरे  पूर्णतः संख्या 30, गोठे/वाडा संख्या 10, दुकाने संख्या 0, मंदिर संख्या  1,अंगणवाडी संख्या  1, शाळा संख्या  2,सार्वजनिक मालमत्ता संख्या 3, मोठी जनावरे संख्या 11, छोटी जनावरे संख्या 2,  बकरी संख्या  15,कोंबड्या संख्या 0, शेती विविध प्रकारची नुकसान क्षेत्र हे आर मध्ये 84.44 हे आर , एकूण बाधित शेतकरी संख्या 441 इत्यादी झालेले नुकसान आहे.पोलादपूर तालुक्यातील नुकसानीबाबतची  माहिती :- एकूण बाधित  कुटुंब संख्या 751 त्यापैकी पंचनामे  झालेल्या  कुटुंब संख्या 560 शिल्लक  पंचनामे कुटुंब संख्या 191 घरे अंशतः संख्या 552, घरे  पूर्णतः संख्या 8, गोठे/वाडा संख्या 18, दुकाने संख्या 0, मंदिर संख्या  1,अंगणवाडी संख्या  2, शाळा संख्या  0, सार्वजनिक मालमत्ता संख्या 2, मोठी जनावरे संख्या 32, छोटी जनावरे संख्या 0, बकरी संख्या 8, कोंबड्या संख्या 5, शेती विविध प्रकारची नुकसान क्षेत्र हे आर मध्ये 30.00 हे आर, एकूण बाधित शेतकरी संख्या 121, इत्यादी झालेले नुकसान आहे.

तळीयेची दरड दुर्घटना अकल्पनीयजिल्हा आपत्ती निवारण विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात दरड प्रवण म्हणून महाड तालुक्यातील तळीये गावाचा समावेश नव्हता, असे असतानाही या गावात दरड दुर्घटना घडणे हे अकल्पनीय आहे. त्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, राज्य इकाई-महाराष्ट्र तसेच प्रकल्प संचालक, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य युनिट, पुणे यांना या गावांचे सर्वेक्षण करुन अहवाल मिळाल्यानंतर समजेल. असेही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले. 

आता आजार रोखण्यासाठी प्रयत्नपुरपरिस्थितीनंतर आता महाड पोलादपूर तालुक्यात अस्वच्छतेमुळे उद्भवणार्‍या साथीच्या आजारांची साथ रोखण्याची महत्वाची जबाबदारी आहे. त्यासाठी जनतेने सहकार्य करुन अधिकाधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. डायरिया होऊ नये याासाठी विशेषतः लहान मुलांना योग्य ते औषधे तसेच ओआरएस देण्याचे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे. 

कोरोना संसर्गितांचे गृहविलगीकरणमहाड आणि पोलादपूर तालुक्यात पूरपरिस्थितीनंतर कोरोनाची टेस्ट करुन घेणे आवश्यक आहे. मात्र रुग्णालयात विलगीकरणाच्या भीतीमुळे नागरिक टेस्ट करुन घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे कोरोना संसर्गित आढळणार्‍या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्याची सक्ती न करता घरीच विलगीकरण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांच्यासाठी सर्व औषधोपचार पुरविण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले.

Exit mobile version