दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम साधने, साहित्याचे वाटप

। महाड । प्रतिनिधी ।
महानगर गॅस निगम मुंबई, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम मुंबई, (अलमीको) महाड येथील श्री समर्थ दिव्यांग कल्याणकारी संस्था, महाराष्ट्र दिव्यांग कर्मचारी संघटना यांच्यातर्फे महाड पोलादपूर तालुक्यातील दिव्यांगांना कृतिक साधने व साहित्याचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून महानगर निगमचे सुशांत राऊत, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज काळीजकर, महानगरचे वाघेला, कृष्णा मौर्य, गिरीश साळुंखे, दिव्यांग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार, समर्थ दिव्यांग संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती शेडगे, तसेच दिगंबर पवार, शिवाजी पाटील, मोबिन देशमुख अतिफ चाफेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सुशांत राऊत पुढे म्हणाले महानगर गॅस लिमिटेड या कंपनीमार्फत गेल्या तीन वर्षापासून अपंग उपकरण सहाय्य वितरण कार्यक्रम राबविला जात आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक दिव्यांग व अपंग व्यक्ती स्वावलंबी आत्मनिर्भर झाले आहेत. आज महाडमध्ये शिबिराचे आयोजन करण्याचा उद्देश स्पष्ट करताना ते म्हणाले एलिम्को या संस्थेच्या मदतीने महाड तालुका व परिसरातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले होते यामध्ये 450 अपंग व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यातील 354 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली या निवड करण्यात आलेल्या दिव्यांग व्यक्तींना सुमारे चार कोटी रुपयांच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले, यामध्ये व्हील चेअर, बॅटरी ऑपरेटर सायकल, कृत्रिम अवयव, मोबाइल फोन, आधार काठी इत्यादी वस्तूंचा समावेश रस्त्याचे ते म्हणाले
रा जि प सदस्य मनोज काळीजकर म्हणाले, महानगर गॅस निगम लिमिटेड या कंपनीतर्फे दिव्यांग व्यक्तींसाठी अतिशय चांगला उपक्रम राबवीत असल्या बद्दल त्यांनी कौतुक केले. विविध कंपन्यातून सी एस आर निधीअंतर्गत ज्या योजना राबवतात, त्यातून सर्वसामान्य नागरिकाला लाभ होतो, परंतु महानगर गॅस हा दिव्यांग व्यक्तीला जीवनाचा मार्ग दाखवतो त्यांचा हा उपक्रम आगळा वेगळा असून कंपनीला त्यांनी धन्यवाद दिले.

दिव्यांग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार यांनी आपल्या भाषणात दिव्यांग व्यक्तींना येणार्‍या अडचणी सांगितल्या. या सहाय्यक उपकरणामुळे त्यांना जगण्याची उमेद मिळाली आहे, या ठिकाणी ज्या दिव्यांगांना वस्तूं देण्यात आल्या आहेत त्या वस्तूचा वापर त्यांनी नियमित करावा असे आवाहन केले. कार्यक्रमाला महाड पोलादपूर माणगाव श्रीवर्धन म्हसळा इत्यादी तालुक्यातून 400 पेक्षा अधिक दिव्यांग व्यक्ती उपस्थित होत्या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिवाजी पाटील यांनी केले तसेच कार्यक्रमामध्ये महाड तालुक्यात श्री समर्थ दिव्यांग कल्याणकारी संस्था स्थापन करून त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले कै. दादा शेडगे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Exit mobile version