महाड | प्रतिनिधी |
महाड मधील श्री समर्थ दिव्यांग कल्याणकारी संस्थेच्या माध्यमांतुन तालुक्यांतील दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्राचे वाटप करण्ंयांत आले, जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने महाड पंचायत समितीच्या स्व. बाळासाहेब ठाकरे प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यांत आला होता.
महाड तालुक्यांतील दिव्यांग व्यक्तींना भारत सरकार कडून देण्यांत येणारे दिव्यांग प्रमाणपत्र दुर्गम आणि खेडोपाड्यांतील व्यक्तीना सहजतेने मिळावे या करीता श्री समर्थ दिव्यांग कल्याणकारी संस्थेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.तालुक्यांतील दिव्यांग व्यक्ती या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमा मध्ये सुमारे शंभर पेक्षा अधिक प्रमाणपत्राचे वाटप करण्यांत आले.यावेळी दिव्यांग व्यक्तीं करीता शासनाच्या असलेल्या योजनांची माहिती देखिल देण्यांत आली.कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज काळीजकर,महाडपंचायत समितीच्या सभापती श्रीमती सिध्दी खांबे,महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्या ध्यक्ष साईनाथ पवार,पंचायत समितीच्या माजी सभापती श्रीमती सपना मालुसरे,संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सपना दिलीप शेडगे,त्याच बरोबर समाजकल्याण विभागाचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी काळीजकर मार्गदर्शन करताना म्हणाले,दिव्यांग व्यक्ती करीता शासनाच्या अनेक योजना असुन त्या योजनांची माहिती जाणुन घ्यावी त्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा,तर साईनाथ पवार यांनी दिव्यांग व्यक्तींनी प्रमाण पत्राच्या आधारे शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यास सांगितले.महाड तालुक्यांमध्ये श्री समर्थ दिव्यांग कल्याणकारी संस्था दिव्यांग व्यक्तीं करीता अतिशय चांगले काम करीत असल्याचे म्हणाले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष शैलेश बावळेकर,सचिव अनिल जाधव,खजिनदार मुबीन देशमुख यांनी विषेश प्रयत्न केले.