| आगरदांडा | प्रतिनिधी |
बांबू वृक्षाचे लागवड मोठ्या प्रमाणात व्हावे व शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी अटल बांबू समृद्धी योजने अंतर्गत बांबूच्या रोपांचे वाटप करण्यात आले. ज्या शेतकऱ्यांनी गेल्यावर्षी कंपनी तर्फे अर्ज केला होता अशा शेतकऱ्यांना नुकतेच मुरूड-जंजिरा शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे कंपनी कार्यालयात सचिव दिनेश मिनमिने यांच्या हस्ते रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी कंपनीचे इतर संचालक निखिल मानजी, पुष्कर भोईर, गणेश गाणार, मुशरीफ खतीब, अनिल नाकती यांनी देखील उपस्थित राहून शेतकरी सभासदांना बांबूच्या रोपांचे वाटप केले. या कार्यक्रमात शेतकरी लाभार्थी मोहन पाटील, शाबाज उलडे, दिलावर सौदागर, समित दळवी, महेश जोशी, मनोज रणदिवे, दामोदर थळे, दाऊद हसवारे, दामोदर रिकामे हे देखील उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सचिव दिनेश मिणमीने यांनी सांगितले की, शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे कंपनी तर्फे शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केले जाते. बांबू वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात होणे ही काळाची गरज आहे. यासाठी शासनातर्फे विविध योजना राबवल्या जातात त्याचा शेतकरी वर्गाने उचित फायदा घेतला पाहिजे. यावेळी असंख्य शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.
शेतकऱ्यांना बांबू रोपांचे वाटप
