वाणदे येथे सायकलींचे वाटप; चित्रलेखा पाटील यांचे सहकार्य

। कोर्लई । वार्ताहर ।
मुरूड तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा नऊगांव आगरी समाजाचे अध्यक्ष तुकाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्यातर्फे वाणदे, शिघ्रे, नवीवाडी, आदिवासीवाडी, नागशेत जोसरांजण, उंडरगांव, आंबोली बौद्धवाडी येथील गरिब गरजू मुलींना आयोजित कार्यक्रमात सायकल वाटप करण्यात आले.


रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्यानम्रता कासार, वावडुंगी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अजित कासार, पुरोगामी युवक संघटनेचे उपाध्यक्ष राईल कडू, पंचायत समितीचे माजी सभापती किशोर धामणस्कर, भरत महादान, राजेश करजेकर, अशोक नाक्ती, अमोल पाटील, श्रीकांत वारगे, स्वाती वारगे, प्रदीप दिवेकर, प्रकाश भायदे, सखाराम गायकर, अमित गायकर, राजेश दिवेकर, गणेश नाक्ती, कलावती पाटील, पप्पू कासार, रामचंद्र पाटील, पालक,विद्यार्थी विद्यार्थीनी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी नऊगांव आगरी समाज अध्यक्ष, खारआंबोली विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन तथा मुरुड स्वप्नपूर्ती कंपनी संचालक, पंचक्रोशी आगरी समाज सल्लागार तुकाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने अभिष्टचिंतन करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधून चित्रलेखा पाटील यांच्यातर्फे गरिब गरजू मुलींना सायकल वाटप करण्यात आले. यावेळी अजित कासार, तुकाराम पाटील, रामचंद्र पाटील, अनंता ठाकूर, किशोर धामणस्कर, घनश्याम श्रीवर्धनकर आदींनी आपले विचार मांडले.
शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडितशेठ पाटील, आस्वाद पाटील, चित्रलेखा पाटील यांनी माझ्या गावात, परीसरात व तालुक्यात अनेक विविध विकास कामे केली. त्यांच्याकडून गोरगरीब जनतेसाठी अशीच कामे व्हावीत, अशी भावना तुकाराम पाटील यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्ता माळी यांनी केले.

Exit mobile version