रोहा तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सायकल वाटप

न्हावे , नवखार, सोनखार या गावातील ९१ गरीब व गरजू मुलींना मदतीचा हात
। रोहा । वार्ताहर ।
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बुधवार दि ८ जून रोजी गरीब व गरजू ९१ विद्यार्थींना न्हावे येथे सायकलींचे वाटप करण्यात आले. मुलींना शालेय शिक्षणासाठी गावातून चणेरा पर्यंत होणारी पायपीट थांबावी , महीला आघाडी प्रमुख , अलिबाग नगरसेवीका चित्रलेखाताई पाटील यांच्या माध्यमातून आतापर्यंत १५ हजार मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले. काही कारणास्तव चित्रलेखाताई पाटील कार्यक्रमाला आल्या नसल्याने


शेकापचे जेष्ठ नेते शंकरराव म्हसकर यांच्याहस्ते दिप प्रज्वलित करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच न्हावे अंगणवाडीचे उद्घाटन लक्ष्मण महाले यांच्याहस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी परशुराम वाघमारे , हेमंत ठाकूर , जितेंद्र जोशी , वायगुडा , चंद्रकांत विचारे , दत्तात्रेय पोवळे , नारायण गायकर , राज जोशी , संदेश विचारे , शशिकांत कडू , गणेश खरीवले , अमोल शिंगरे , प्रशांत शिंदे , तुकाराम शिंदे , पांडुरंग तांबडे , शिवराम महाबळे , काशिनाथ भोईर , जिवन देशमुख , राजेश्री शाबासकर , विकास भायतांडेल , मिथुन सर्लेकर , संतोष देवाळे , महेश बटाटे , गोविंद भायतांडेल ,सदानंद पाटील , हर्षला सर्लेकर , आशा झुरे तसेच ग्रामस्थ व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सादीक रोगे यांनी केले.

Exit mobile version