उरण येथे विद्यार्थिंना सायकल वाटप

चित्रलेखा पाटील यांची सामाजिक बांधिलकी
| उरण | वार्ताहर |

शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नांतून सीएफटीआय कंपनी आणि शेरोन बायोमेडिसिन या कंपनीच्या संयुक्त विद्यमाने उरण तालुक्यातील इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थिनींना 50 सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तथा शेकापच्या नेत्या सीमा घरत उपस्थित होत्या.

उरण येथील एस.एस. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शेकापचे सरचिटणीस यशवंत ठाकूर, अनंत घरत, महालन अध्यक्षा रेखा घरत, फुंडे ग्रामपंचायत सदस्य कविता म्हात्रे, शेकाप महिला सचिव नूतन पाटील, प्रमुख पाहुणे दीपिका पाटील, शहर अध्यक्षा नयना पाटील, वुमन क्लब अध्यक्षा नयना ठाकूर, अमित देशमुख, कंपनीचे अधिकारी, पालक, विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते. चित्रलेखा पाटील व सीमा घरत यांनी समाजाभिमुख कार्य घडवून आणल्याबद्दल त्यांना धन्यवाद देण्यात आले.

Exit mobile version