उरणमध्ये गरजूंना सायकलचे वाटप

। उरण । वार्ताहर ।
उरण परिसरातील गरजू विद्यार्थींनींना शैक्षणिक प्रगतीसाठी शेरॉन बायोमेडिसीन लि. व सेंटर फॉर ट्रान्सफॉरमिंग इंडिया यांच्या वतीने सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करीत या उपक्रमामुळे या परिसराची शैक्षणिक प्रगती निश्‍चित उंचावेल असा विश्‍वास व्यक्त केला.
उरण परिसरातील केगाव, कोटनाका, टेलिपाडा, मोरा, म्हातोली, जासई, बोकडविरा, कोळीवाडा, फुंडे, बोरी आणि करळपाडा या गावातील काही विद्यार्थिनी अतिशय गरीब कुटुंबातील असून त्यांना शिक्षणासाठी व अन्य गोष्टींसाठी पायी चालत जावे लागत होते. या विद्यार्थिनींची दखल घेत शेरॉन कंपनीमार्फत 50 विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले.
यावेळी शेरॉन बायोमेडिसीन कंपनीच्या वतीने डॉ.दिपक घाटे व निती मेश्राम या अधिकार्‍यांनी प्रमुख हजेरी लावली होती. तसेच उरणमधील सीमा घरत सामाजिक कार्यकर्ते, यशवंत पाटील सामाजिक कार्यकर्ते व परिसरातील नागरीक या कार्यक्रमाला हजर होते.

Exit mobile version