। उरण । वार्ताहर ।
श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण तालुक्याच्या वतीने दरवर्षी पनवेल रेल्वे स्टेशन येथे गोरगरीब, गरजू व्यक्तींना थंडीच्या दिवसात गरम ब्लँकेटचे वाटप करण्यात येते. गोरगरिबांचे थंडी पासून संरक्षण व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. याही वर्षी पनवेल रेल्वे स्टेशन बाहेरील गोरगरीब व गरजू व्यक्तींना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, संस्थेचे मार्गदर्शक सल्लागार अॅड.गुरुनाथ भगत, सामाजिक कार्यकर्ते श्रीपत भगत, सचिव प्रेम म्हात्रे, सदस्य नितेश पवार, शुभम ठाकूर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.