| माणगाव | सलीम शेख |
सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या चॅरिझेन व रेड हाऊस (शंतनू कुकडे) फाउंडेशन यांच्यामार्फत माणगाव शहरातील बहुजन समाजातील गोरगरीब जनतेला सोमवारी (दि.21) रोजी माणगाव एकतानगर येथील सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रुपेश जाधव यांच्या हस्ते ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. फाउंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमाचे सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा जाधव यांनी विशेष कौतुक केले.
सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा जाधव या माणगाव तालुक्यासह मुंबईत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून बहुजन समाजात काम करीत आहेत. गोरगरीब जनतेला मदत करणे या कामी त्यांना विशेष आवड आहे. गरिबांना तसेच बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने त्या काम करीत आहेत. नजीकच्याच काळात माणगाव शहरात विविध छोटे मोठे उद्योग सुरु करण्याचा त्यांचा प्रामाणिक मानस आहे. यातून गोरगरीब जनतेला रोजगार उपलब्ध होऊन त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागेल असे त्यांचे मत आहे. गरीब जनतेसाठी समाजात काम करीत असल्याने त्यांच्या विशेष प्रयत्नांनी चॅरिझेन व रेड हाऊस फाउंडेशन यांच्या सहकार्याने त्यांनी माणगाव शहरातील गोरगरीब अशा 300 लोकांना सोमवारी ब्लँकेटचे वाटप आपल्या हस्ते केले. त्यावेळी उपस्थितीत महिलांनी व नागरिकांनी फाउंडेशन बरोबरच सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा जाधव यांचे विशेष ऋण व आभार व्यक्त केले.







