। माणगाव । प्रतिनिधी ।
सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या चॅरिझेन व रेड हाऊस फाउंडेशन यांच्यामार्फत माणगाव शहरातील गरजूंना सोमवारी (दि.21) सुवर्णा जाधव यांच्या हस्ते ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा जाधव या माणगाव तालुक्यासह मुंबईत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून बहुजन समाजात काम करीत आहेत. गरिबांना तसेच बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने त्या काम करीत आहेत. यातून गोरगरीब जनतेला रोजगार उपलब्ध होऊन त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागेल, असे त्यांचे मत आहे. गरीब जनतेसाठी समाजात काम करीत असल्याने त्यांच्या विशेष प्रयत्नांनी चॅरिझेन व रेड हाऊस फाउंडेशन यांच्या सहकार्याने त्यांनी माणगाव शहरातील गोरगरीब अशा 300 लोकांना ब्लँकेटचे वाटप केले.