। कोलाड । वार्ताहर ।
लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231 अ 4 यांच्या कृपाछत्राखाली तसेच, क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सागर सानप यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 4 वर्षे कोलाड लायन्स क्लब संस्था सामजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य व पर्यावरण अशा विविध क्षेत्रात काम करीत आहे. ग्रामीण भागातील तळागाळातील गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी जनतेच्या हितासाठी विविध उपक्रम राबवत असते. त्यातच कोलाड परिसरातील पाले खुर्द आदिवासीवाडीतील रायगड जिल्हा परिषद शाळेतील 20 विद्यार्थ्यांना लायन्स क्लब कोलाड तसेच, एमजेएफ लायन विजय गणत्रा यांच्या विशेष सहकार्यातून ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महादेव सरसंबे, कोलाड लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. मंगेश सानप, उपाध्यक्ष डॉ. श्यामभाऊ लोखंडे, मुख्यापक आशिष पवार, शिक्षक रंजित पाटील व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.