| पोयनाड | वार्ताहर |
रायगड वकील संघटनेचे अध्यक्ष तथा रायगड जिल्हा नियोजन व शांतता कमिटीचे सदस्य अॅड. प्रवीण ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या समर्थकांनी व चाहत्यांनी त्यांना वह्या, पुस्तके भेट म्हणून दिली होती. भेट म्हणून आलेल्या वह्यांचे अलिबाग तालुक्यातील विविध शाळांमध्ये वाटप करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनी पोयनाड विभागातील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा पोयनाड व भाकरवड शाळेत वह्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव व ग्रामपंचायत पोयनाडचे सदस्य सुनिल पाटील, शाळा कमिटीचे अध्यक्ष प्रशांत पाटील, मुख्याध्यापक वनिता म्हात्रे, विनायक पाटील, ग्रा. पं. सदस्य किशोर जैन, अजित चवरकर, तालुका इंटकचे अध्यक्ष पंकज चवरकर, अॅड. पंकज पंडित, वैभवी चवरकर, दिलीप कारेकर यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.