| अलिबाग | वार्ताहर |
जिल्ह्यातील कौशल्य विकास प्रशिक्षण देणार्या जे. एस. एस. रायगडच्या साधनव्यक्ती व कर्मचार्यांसाठी जन शिक्षण संस्थान रायगड, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता रायगड-अलिबाग व मॅड्स सोल्युशन अॅण्ड सर्व्हिसेस फॉर सोशल इनिशिएटिव्ह यांच्या माध्यमातून दोन दिवसीय कौशल्यवृध्दी व क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यशाळेचे प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम सहाण-अलिबाग येथे संपन्न झाला. प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाच्या प्रसंगी रायगडचे अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, उपाध्यक्षा गीतांजली ओक, सहाय्यक आयुक्त- शालिक पवार, संजय वर्तक, महाव्यवस्थापक- निशिकांत नार्वेकर, चार्टर्ड अकॉउंटन्ट- संजय राऊत, बोर्ड मेंबर- अॅड. नीला तुळपुळे, रत्नप्रभा बेल्हेकर, संचालक विजय कोकणे, जिल्हा कौशल्य कार्यालयाचे प्रतिनिधी संजय उगले, सदर मान्यवरांच्या उपस्थितीत व जन शिक्षण संस्थान रायगडचे कर्मचारी प्रतिक्षा चव्हाण,कल्पना म्हात्रे, ओंकार बोरकर व सुकन्या नांदगावकर यांच्या उपस्थितीत पार पडला. प्रशिक्षण शिबिरामध्ये स्वयं व सांघिक सशक्तीकरण प्रशिक्षण कार्यक्रम या विषयावरती उपस्थितांना डॉ. मेधा सोमैया, प्राध्यापिका ममता अय्यर, सौ. शितल सुनील पाटील, शालिक पवार निशिकांत नार्वेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन झाले.