खालापूरात जातीच्या दाखल्यांचे वाटप

। रसायनी। वार्ताहर ।

कोकण विभागीय आयुक्त पी. वेलरासु, जिल्हाधिकारी रायगड किसन जावळे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उप विभागीय अधिकारी कर्जत अजित नैराळे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव, तहसीलदार खालापूर आयुब तांबोळी, मंडळ अधिकारी पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यातील नावंढे वाडी, घोडीवळी वाडी, हाल वाडी येथील कातकरी जमातीतील लोकांचे जातीचे दाखले वाटप करण्यात आले.

टाटा स्टील फाऊंडेशनच्यावतीने पहचान प्रकल्पांतर्गत खालापूर तालुक्यातील आदिवासी वाड्यांवर जातीच्या दाखल्यांचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये वाड्यावस्त्यांवरील कातकरी समाजातील लोकांचे जातीच्या दाखल्यासाठी अर्ज तयार करण्याचे काम उरण सामाजिक संस्थेने केले त्यास महसूल विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहकार्य केले. टाटा स्टील फाऊंडेशन यांनी पहचान प्रकल्पांतर्गत पुढाकार घेतला आणि उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सदरहू उपक्रम यशस्वी पणे राबविला. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या वतीने प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव आणि निरिक्षक दळवी यांनी खूप सहकार्य केले. भावेश रावल आणि उदय गावंड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सरचिटणीस संतोष पवार, उपाध्यक्ष दिनेश घरत यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड भूषण दत्ता गोंधळी, सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर, सदस्य मनीष कातकरी यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version