। रसायनी । वार्ताहर ।
आदिवासीसाठी सुरु करण्यात आलेल्या सप्तसूत्री कार्यक्रमांतर्गत वावोशी मंडळाचे मंडळ अधिकारी तुषार कामत यांनी दाखले वाटप कार्यक्रम मौजे माडप येथील आदिवासी वाडीत आयोजित केला होता.यावेळी तहसीलदार आयुब तांबोळी यांनी आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी व खर्या अर्थाने कातकरी उत्थान कार्यक्रमाची गरज आहे, बाल संरक्षण कायदा, शेती,वैद्यकीय मदत,जातीचे प्रमाणपत्र,संजय गांधी अनुदान निराधार योजना यांच्यासाठी लागणार्या कागदपत्रांची पूर्तता कशी करावी याचे मार्गदर्शन केले.
यावेळी महिलांची आरोग्य तपासणी डॉ.सीमा पाईकराव व त्यांच्या सहकार्यांनी केली.जातीचे प्रमाणपत्र वाटप,रेशनकार्ड वाटप,संजय गांधी अनुदान वाटप करण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार राजश्री जोगी,मंडळ अधिकारी किरण पाटील,उपसभापती विश्वनाथ पाटील,सरपंच नितीन पाटील,ग्रामविकास अधिकारी अजय फोफेरकर,बाल संरक्षण च्या सकपाळ, वाघ,देवरुखकर,तलाठी शिंदे यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
माडप आदिवासीवाडीत दाखले वाटप
