। रसायनी । वार्ताहर ।
तहसिलदार आयुब तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली चौक मंडळ अधिकारी किरण पाटील यांनी आयोजीत केलेल्या महाराजस्व अभियान अंतर्गत शैक्षणिक व अन्य शासकीय कामाला लागणाऱ्या शासकिय दाखले वाटप शिबिरात अनेक लाभार्थी यांनी त्याचा फायदा घेतला.
महाराजस्व अभियान अंतर्गत विद्यार्थी यांना शाळा, महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय व अन्य शैक्षणिक ठिकाणीं प्रवेश व अन्य शैक्षणिक कासाठी तसेच जेष्ठ नागरिक, शेतकरी, संजय गांधी निराधार योजना, घरकुल, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर दाखला, तलाठी चौकशी पंचनामा, उत्पन्नाचा १ वर्ष, ३ वर्ष दाखला, जेष्ठ नागरिक बस सवलत, वय व अधिवास दाखला व शासकीय कामाला लागणाऱ्या शासकिय दाखले एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी चौक येथील जेष्ठ नागरिक सभागृहात दाखले वाटप शिबिर उपविभागीय अधिकारी अजित नैराले व तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी किरण पाटील यांनी आयोजित केले होते, त्याचे उद्घाटन नायब तहसीलदार विजय पुजारी यांच्याहस्ते करण्यात आले.
तसेच हे दाखले मोफत वाटप करून त्याला लागणाऱ्या छायांकित प्रत ही मोफत काढून देण्यात आल्या. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी तलाठी अमोल बोराटे, तलाठी व्ही. एच. मुगदन, तलाठी मधुसूदन पांपटवार, तलाठी अभिजित हिवरकर, तलाठी शीतल मांदारे यांच्यासह कोतवाल मंगेश डुकरे, रुपाली खराल, सूरज गायकवाड, किशोर देशमुख, शंकर होला, देविदास गुरव, ई सुविधा सेतू व आपले सरकार कार्यालय यांनी विशेष परिश्रम घेतले. शैक्षणिक प्रवेश व इतर कामासाठी लागणारे दाखले एकाच ठिकाणी, एकाच दिवशी मोफत उपलब्ध झाल्याने आमची शारीरिक मेहनत व पैसे यांची बचत झाल्याचे विद्यार्थी यांनी सांगितले. जेष्ठ नागरिक यांनी या शिबिर आयोजकांचे आभार मानले. सायंकाळी दाखल्यांचे वाटप नायब तहसिलदार विजय पुजारी, मंडल अधिकारी किरण पाटील, गणेश मुंडे यांच्याहस्ते कण्यात आले.