आदिवासी बांधवांना कपड्यांचे वाटप

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायतीमधील सालवड आणि कळंबोली वाडीमधील आदिवासी महिला आणि मुलांना मुंबई येथील सुखजीवन रिटायर्ड होम संस्थेकडून कपडे वाटप करण्यात आले.
मुंबई येथील सुखजीवन रिटायर्ड होम संस्थेच्या एलएलपी संस्थेच्या वतीने सालवड आणि कळंबोली दोन गावांमधील आदिवासी महिला आणि लहान मुलांना कपडे वाटप करण्यात आले. यात साडी, ड्रेस, स्वेटर, ब्लँकेट, शॉल आदींचा समावेश होता. साधारणपणे 400 आदिवासी यांना कपडे वाटण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संस्थापक आसन सुखवानी तसेच नितु चावला, विकास गेचेद, ईश्‍वरी सावलानी, कांता मगणानी, वनिता मगणानी आदी उपस्थित होते. नसरापूरचे उपसरपंच अ‍ॅड. संपत पांडुरंग हडप यांच्या प्रयत्नाने या संस्थेने ही मदत वाटप केली. यावेळी स्थानिक ग्रामस्थ महेश हडप, दशरथ देशमुख, रंभाजी हडप, मोहन हडप, सचिन हडप, अतुल हडप आदी उपस्थित होते.

Exit mobile version