गणेशोत्सवात आदिवासी मुलांना कपडे वाटप

वाकणवाडी ग्रामस्थांचा उपक्रम

। पाली/बेणसे । वार्ताहर ।

सुधागड तालुक्यातील वाकणवाडी ग्रामस्थ विविध सण, उत्सव व जयंती विधायक उपक्रमांनी साजरे करत आहेत. यंदा गणेशोत्सवा निमित्त नुकतेच गावातील सर्व आदिवासी लहान मुलांना नवीन कपडे व खाऊ देऊन उत्सव साजरा केला. अशा प्रकारे विविध सण आणि महापुरुषांच्या जयंती विधायक उपक्रमाद्वारे राबवून वाकणवाडी गावाने एक नवा आदर्श घालून दिला आहे.

या कपडे व खाऊ उपक्रमास तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी आर्थिक मदत केली. कार्यक्रमास पोंगडे महाराज, तुकाराम ठोंबरे, महादू दळवी, गजानन दळवी, ज्ञानेश्‍वर फोंडे, ज्ञानेश्‍वर हुले, निलेश हुले, सोनू पोंगडे, तुकाराम चव्हाण, रघुनाथ दळवी, तानाजी दळवी, विनायक पोंगडे, सटूराम पोंगडे, अमोल पोंगडे, दीपक पोंगडे, सुभाष फोंडे, महादू बेलोसे, लक्ष्मण पोंगडे आदी ग्रामस्थ, शिक्षक वैभव नाणेकर, कैलास सांगळे, आदिवासी तरुण व विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version