| पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेचा 148 वा वर्धापन सोहळा उत्साहात साजरा. यावेळी अनंत पोंगडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच दिवंगत व्यक्तींना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. 148 वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त शाळेतील इ.1 ली ते इ.7 विद्यार्थी तसेच गावातील 10 वी, 12 वी, पदवीधर, विशेष नैपुण्य प्राप्त विद्यार्थी यांचा गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना शालेय वर्धापन दिन कमिटी, ग्रामपंचायत सदस्या समृध्दी संतोष यादव, शाळेय कमिटी सुजाता यादव, मारुती यादव, समाजसेवक नरेश यादव, बापूजी क्रिकेट, दत्तगुरु मित्रमंडळ, उत्कर्ष मंडळ, ग्रीन गोल्ड तसेच कायम ठेव देणगीदार यांचे मार्फत विद्यार्थ्यांसाठी बक्षीस प्राप्त झाली होती. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजने अंतर्गत 13 मुलींना दत्तक घेऊन शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
सदर कार्यक्रमास अनंत पोंगडे कार्यक्रमाचे अध्यक्ष, सरपंच आशिका पवार, उपसरपंच शरद किंजावडे, ग्रामपंचायत सदस्या समृध्दी यादव, ग्रामसेवक आजिनात खेडकर, माजी सरपंच व मा तंटामुक्ती अध्यक्ष्य संजय शिंदे, सामजिक कार्यकर्ते परमानंद राईलकर, राजन पंडीत, वर्धापन दिन कमिटी अध्यक्ष अविनाश कोनकर, प्रभाकर कोनकर, उपअध्यक्ष संजय शिंदे, व सर्व सदस्य, पोलीस पाटील सुनील पोंगडे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश जाधव, केंद्रप्रमुख कैलास म्हात्रे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र यादव व सर्व सदस्य, पत्रकार मंगेश यादव, नितीन यादव, ग्रुप ग्रामपंचायतचे शिपाई सचिन मुंढे आणि ज्यांनी शाळेचे नाव उज्वल करण्यासाठी व विद्यार्थांसाठी अहोरात्र मेहनत घेतली ते शाळेचे शिक्षक वृंद गजानन भिलारे सर,पापटकर मॅडम, माधवी गुरव मॅडम तसेच माजी शिक्षक बेलोसे सर, शिंदे सर, अंगणवाडी सेविका भोनकर मॅडम, वकील कदम भाऊ, माजी विद्यार्थी, सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन भिलारे सर यांनी केले.